बीड दि.१४ (प्रतिनिधी): (Beed )गेल्या सहा महिन्यांपासून तळेगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये दोन शिक्षक (Alcoholic Teacher)सतत दारू पिऊन येतात, कार्यालयात बसतात.ग्रामस्थ विचारायला गेल्यास उद्धटपणे जवाब देतात. याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही त्यांच्यावर कसलीच कारवाई होत नसल्याने आज (sarpanch)सरपंच आणि ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करत तात्काळ या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, तळेगाव या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून या ठिकाणी सहा शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी दोन शिक्षक हे प्रत्येक दिवशी दारू(Alcoholic Teacher in Zp school Beed )पिऊन येतात. वर्गात कधी शिकवत नाहीत, (school)शाळेच्या कार्यालयात झोपा काढतात, विद्यार्थ्यांनाही धमकावतात, त्यामुळे ग्रामस्थांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी याची खातरजमा करत शिक्षणाधिकार्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या, मात्र शिक्षणाधिकार्यांनी खुलासा मागवण्याच्या नावाखाली त्यांच्यावर कसलीच (beed)कारवाई न केल्याने आज या गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धाव घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून त्यांच्यावर आठवडाभरात कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.