Advertisement

महाकुंभमेळ्याहून परतताना काळाचा घाला, सिमेंट ट्रकने बसला चिरडलं

प्रजापत्र | Tuesday, 11/02/2025
बातमी शेअर करा

 दिल्ली :  (kumbh mela)कुंभमेळाव्यावरून परतत असलेल्या (mini bus)मिनी बसला ट्रकला धडक दिली. हा अपघात(accident) इतका भीषण होता की ट्रकने दिलेल्या धडकने मिनी बसचा चक्काचूर झाला असून जागेवरच सात जणांचा मृत्यु झाला आहे. बसमधील भाविक हे आंध्र प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती समजत आहे. बलपूरहून प्रयागराजला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३० वर सकाळी नऊच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस पोहोचले आहेत.

हा अपघात एका पुलावर झाला, (truck)ट्रकने धडक दिल्यानंतर कारचे तुकडे झाले. जास्त वेगामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पुलाच्या रेलिंगवर एक गाडी अडकली आहे. मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. (police)पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच मृतांची ओळख पटवली जात आहे. ट्रकमध्ये सिमेंट भरलेले होते. या अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली असून पोलिस वाहतूक सुरळित करण्याच्या कामाला लागले आहे. या अपघातावेळी मिनी बसच्या मागे एक चार चाकी गाडी होती, त्या गाडीलाही धडक बसली. या धडकेवेळी त्यांच्या गाडीच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे मोठा अनर्थ ठरला.

हा अपघात सकाळी ९ वाजता झाला असून अपघात झालेल्या गाडीची नंबर प्लेट आंध्र प्रदेशची आहे. त्यामधील सगळे लोक हे आंध्र प्रदेशचे असल्याचं सांगितलं जात आहे. (kumbh mela)हा अपघात झाला त्यावेळी मिनी बसच्या मागे असलेल्या चार चाकीलाही धडक बसली होती. मात्र गाडीच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे त्यातील सर्व लोक वाचले, जे लोक जखमी झाले त्यांना सिहोरा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं एसडीओपी पारुल शर्मा यांनी म्हटलं आहे.दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर (kumbh mela)महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या वाहनांची एक किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी झाली. कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या लोकांमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला गर्दी झालेली आहे.

Advertisement

Advertisement