Advertisement

 दुचाकींच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 10/02/2025
बातमी शेअर करा

 केज दि.१० (प्रतिनिधी)- (kaij)शहरातील कानडी कॉर्नर वरील भगवान बाबा चौकामध्ये रविवार (दि.९) रोजी रात्रीच्या सुमारास दोन दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये एका ४२ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला .
        

  केज शहरातील नाभिक संघटनेचे संघटक रामरतन मारुती गवळी हे रविवार (दि.९) रोजी रात्री बस स्टॅन्ड कडून कानडी चौकात आले असता कानडी रोडकडे वळताना (accident)छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून आलेल्या अन्य एका दुचाकीची रामरतन गवळी यांच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये रामरतन गवळी हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दरम्यान, सदरील अपघातामध्ये सचिन दशरथ मुळे आणि हनुमंत भागवत काकडे (रा.साबला ता.केज) (kaij)हे दोघे जखमी झाले असून अंबाजोगाई येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Advertisement

Advertisement