Advertisement

 दोन चिमुकल्यांची गळा आवळून हत्या 

प्रजापत्र | Saturday, 08/02/2025
बातमी शेअर करा

 पुणे: पुण्याच्या दौंड येथून एक (Pune Crime)अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने चक्क आपल्या दोन चिमुकल्यांची गळा आवळून हत्या केली आहे. या निर्दयी मातेने पोटच्या पोरांना साखर झोपेत असताना त्यांची हत्या केली. त्यानंतर या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत.(Pune Crime) दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी या आरोपी महिला कोमल दुर्योधन मिंढे या ३० वर्षीय आईला अटक केली आहे. पती पत्नीच्या वादातून ही भयानक घटना घडल्याची माहिती आहे

आज (शनिवार ८ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. ही घटना समजताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

शंभू दुर्योधन मिढे (वय ०१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय ०३ वर्ष) अशी मयत मुलांची नावं आहेत. तर, दुर्योधन आबासाहेब मिढे (वय 35 वर्ष) असं जखमी पतीचं नाव आहे.

शनिनारी पहाटेच्या सुमारास शंभू आणि पियू ही दोन्ही चिमुरडी पोरं निजलेली होती. यादरम्यान पोरं साखर झोपेत असतानाच कोमलने त्यांचा जीव घेतला. ज्या पोरांना तिने स्वत: जन्माला घातलं, आपल्या हातांनी त्यांनी वाढवलं त्याच हातांनी गळा आवळून तिने दोन्ही पोरांची हत्या केली. ती इतक्यावरच थांबली नाही तर त्यानंतर तिने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले. तिने पतीच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केलं आहे. याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला कंटळून कोमलनने हे भयंकर पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. (pune police)सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
 

Advertisement

Advertisement