परळी दि.८(प्रतिनिधी) - तालुक्यातील मालेवाडी येथील माजी सरपंच लक्ष्मण रुपा पवार यांचा हृदय विकाराच्या झटक्याने (दि.८) शनिवार रोजी दुपारी मृत्यु झाला.
अधिक माहिती अशी कि, परळी तालुक्यातील मालेवाडी येथील सरपंच लक्ष्मण रुपा पवार(वय ५२) यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर परळीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते .त्यांनतर सरकारी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बातमी शेअर करा