Advertisement

 'पीएम किसान'चा १९ वा हप्ता 'या' दिवशी मिळणार

प्रजापत्र | Thursday, 06/02/2025
बातमी शेअर करा

 दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम (Pm kisan )किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात देण्यात आला. १८ वा हप्ता मिळाल्यानंतर, देशातील कोट्यवधी शेतकरी १९ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. राज्यातील अंदाजे ९२ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा १९ वा हप्ता येत्या फेब्रुवारीअखेर मिळण्याची शक्यता आहे

वेळापत्रकानुसार या योजनेतील १९ वा हप्ता डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ असा आहे. केंद्राकडून या हप्त्याची रक्कम २४ फेब्रुवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाऊ शकते. त्यासाठी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे. तेथेच १९ व्या हप्त्याचे वाटप होऊ शकते. केंद्रीय कृषी मंत्रालयात त्याबाबत नियोजन चालू असल्याचे कृषी आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. ‘पीएम किसान’मध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची मदत चार महिन्यांच्या टप्प्याने तीन हप्त्यांमध्ये वाटली जाते.

 

अनेक शेतकरी आहेत ज्यांना हा प्रश्न पडतो की , कुटुंबातील पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ एकत्र घेऊ शकतात का? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमांनुसार, कुटुंबातील पती-पत्नी एकत्र या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेचा लाभ दोन सदस्यांपैकी फक्त एकाच सदस्याला मिळेल. या योजनेचा लाभ फक्त कुटुंबातील त्या सदस्याला मिळतो ज्याच्या नावावर शेतीची जमीन नोंदणीकृत आहे. म्हणजेच कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल.
 

Advertisement

Advertisement