अमरावती- अमरावतीमध्ये ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले. जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु आहे. शेतमालाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसेंच्या ताफ्यावर कापूस, सोयाबीन फेकून संताप व्यक्त केला.
बातमी शेअर करा