Advertisement

 बोगस विमा प्रकरणात ९६ सीएससींवर कारवाई

प्रजापत्र | Tuesday, 04/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.४ (प्रतिनिधी)- (Csc)प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये (pik vima)पीक विमा पोर्टलवर बोगस विमा भरण्यात आला होता. भौगोलिक क्षेत्र नसलेल्या गावात अवैध पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील ९६ सीएससींचे आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील ३५, तर  परळीमधील २२ सीएससींचे आयडी आहेत. 

राज्यातील इतर जिल्ह्यातही असा प्रकार आढळून आला होता. परभणी जिल्ह्यात खोट्या कागदपत्रांद्वारे बोगस पीक विमा भरला होता. कोणतेही भौगोलिक क्षेत्र अस्तित्वात नसताना तेथे खोटे सातबारा, आठ-अ सारखे महसुली अभिलेख तयार करून एकूण ९६ सीएससी आयडीधारकांच्या आयडीमधून पीक विमा नोंदणी करून शासनाची फसवणूक करण्यात आली होती. त्यामुळे सदरील ९६ सीएससी आयडी ब्लॉक करण्याची सूचना कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी सीएससी कंपनीला केली होती. 

 

बीड (Beed)जिल्ह्यात ३५ आयडी 

बनावट पीक विमा भरणारे ३५ सीएससीधारक हे बीड जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी २२ जणांचे सीएससी आयडी हे परळी शहर व तालुक्यातील आहेत. उर्वरित अंबाजोगाईतील ६, बीडमधील १ व इतर ६ आयडीधारक हे इतर तालुक्यांतील असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. इतर राज्यांतील ७ आयडी आहेत. 

Advertisement

Advertisement