Advertisement

चंदनसावरगावजवळ दोन कारचा भीषण अपघात

प्रजापत्र | Saturday, 01/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१ (प्रतिनिधी)- (Ambajogai)अंबाजोगाई-केज मार्गावरील चंदनसावरगाव जवळ (दि.३१)शुक्रवार रोजी रात्री १०.४५ च्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यु झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये अमित दिलीपराव कोमटवार (वय ३५, रा. दिंद्रुड, माजलगाव), परमेश्वर नवनाथ काळे ( रा.खांडे पारगाव, बीड), गणपत नारायण गोरे( ४७, रा. सामनापुर ता. जि.बीड) यांचा समावेश आहे. 

सविस्तर माहिती अशी कि, अपघातातील कार क्रमांक (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) यातील वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परमेश्वर  काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे हे गंभीर जखमी अवस्थेत होते. माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार श्री.शेंडगे,श्री. पठाण, श्री.वारे अपघातस्थळी पोहोचले. पोलिसांनी परमेश्वर काळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन  शवविच्छेदनासाठी (kaij )केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर जखमी अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे यांना आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यु झाला

Advertisement

Advertisement