बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात हत्येचा कट रचल्याचा आरोपाखाली एसआयटी कोठडीत असलेल्या (walmik karad)वाल्मिक कराडला बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली होती. त्यामुळे एसआयटीने आज त्याला न्यायालयात हजर केले. (Sit)एसआयटीनेच न्यायालयाकडे एमसीआर मागीतल्याने विशेष मकोका न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी वाल्मिक कराडची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड यांना(beed) बीडच्या कारागृहात पाठविण्यात येणार आहे.
बातमी शेअर करा