Advertisement

मविआ नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट

प्रजापत्र | Sunday, 08/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई - राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे असतात, तेवढेच विरोधक महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. विरोधी पक्ष नेता निवडीसाठी संख्याबळ महत्त्वाचे नाही. हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून दिला. विरोधी पक्षनेतेपदासह विधानसभा उपाध्यक्ष पद मिळावे, असे दोन प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मांडण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन प्रस्तावासंदर्भात सकारात्मक आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर यासंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली. 

 

 

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांची परंपरा होती की, सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपद तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद असावे. भाजपा आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावे, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली, असेही भास्कर जाधव म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा राहिली आहे. विरोधीपक्ष नेता यासंदर्भात व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत आपने भाजपाचा विरोधी पक्षनेता करण्यास दिला. ही भूमिका आम्ही मांडली, असे नाना पटोले यांनी सांगितले.
 

Advertisement

Advertisement