Advertisement

फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

प्रजापत्र | Thursday, 05/12/2024
बातमी शेअर करा

परंडा दि.५ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी परंडा तालुका कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून,पेढे वाटून मोठ्या उत्साहात आनंदोस्तव साजरा करण्यात आला. 

     यावेळी  भाजप नेते बार कौन्सिलचे मा. अध्यक्ष ॲड.मिलींद पाटील,प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.झहीर चौधरी,जिल्हा चिटणीस सुजित परदेशी,युवा मोर्चा चिटणीस रामकृष्ण घोडके,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे,शहराध्यक्ष उमाकांत गोरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव,सरचिटणीस धनाजी गायकवाड,साहेबराव पाडुळे,तुकाराम हजारे,मिलींद शिंदे,धनंजय काळे,गौरव पाटील,सुरज काळे,आदर्श ठाकूर,अमर ठाकूर,सिध्दीक हन्नूरे,अजिम हन्नूरे,जयंत भातलवंडे,जयंत सायकर,जोतीराम गिरवले,किरण कवटे तसेच इतर भाजपचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement