मुंबई- राज्यात नव्या सरकार स्थापनेआधी घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शपथविधी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती बिघडी आहे. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहेत. त्यामुळे त्यांना अजूनही उपचाराची गरज आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना अशक्तपणा आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. तेथील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करणार आहे.
बातमी शेअर करा