Advertisement

ईव्हीएम वरून लक्ष हटवण्यासाठी शिंदे भाजपचा खेळ सुरू

प्रजापत्र | Monday, 02/12/2024
बातमी शेअर करा

महायुतीचा एकहाती विजय हा ईव्हीएम मशीन हॅक करूनच झाला आहे. विरोधी पक्षांनी यावर आवाज उठविल्यानंतर आता त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी या सगळ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, ते दरे गावात जाऊन काय बसले.शेवटी यांना भाजपा सांगेल तेच करायचे आहे अशी टीका करत मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ता स्थापनेच्या विलंबावरून महायुती सरकार व शिंदे यांना टोला लगावला आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण ६५ हजार मतदार यंदा वाढले. आणि ६६ हजार मतांनी शिंदे गटाचे राजेश मोरे विजयी झाले. वाढलेलं सगळे मतदान त्यांनाच मिळाले का ? असा सवाल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला आहे.एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी व्हीव्हीपॅट मशीनमधील मते मोजण्याकरीता आठ लाख रुपये भरले आहेत असे सांगितले.विधानसभेच्या निकालानंतर विरोधी पक्षाकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असून ईव्हीएम विरोधात मोहीम देखील छेडण्यात आली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केलाय.

लोकसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघात ६५ हजार मतदान वाढलं. हे वाढलेलं संपूर्ण मतदान विजयी उमेदवाराला कसं काय जाऊ शकतं असा सवाल माजी आमदार पाटील यांनी उपस्थित केलाय.

याविषयी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, निकाल लागला त्याचा मी स्वीकार केलाय. राज्यात ज्या गोष्टी घडतायत, ईव्हीएम बद्दल बोंबाबोंब चालू आहे, मनसेने २०१८ मध्ये ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली होती.यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक लोक मला भेटतात तुम्हालाच भरभरून मतदान केलं सांगतात. मात्र ते दिसत नाही असं ही म्हणतात. या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याने व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी आठ लाख रुपये भरले आहेत. आता पाहूया पुढे काय होते असे पाटील म्हणाले.

Advertisement

Advertisement