सिडको : शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घर वापसीचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना ठाकरे गटात जाण्यापूर्वी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. परंतू नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. माजी आमदार डॉ. हिरे यांचे अजित पवार यांच्या समवेत चांगला संपर्क असल्याने त्यांनी सोमवारी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घर वापसी चा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सिडको सातपुर भागात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच दिनांक ५ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळ शपथ विधी झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. तसेच आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुक संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. पुन्हा दि. ५ डिसेंबर नंतर बैठक होणार आहे .
डॉ. अपूर्व हिरे, माजी आमदार