मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार विजय मिळवला आहे. महायुतीच्या विजयानंतर भाजप, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांच्या भेटी घेत विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीवेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा सत्कार केला. यावेळी भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.
परळी विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करून अभिनंदन केले.
देवेंद्र फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील युतीच्या महाविजयाबद्दल अभिनंदन धनंजय मुंडे यांचं अभिनंदन केलं. 'माझ्या घरी आलात तर माझा नियम चालणार', असं फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना म्हटलं नाही. यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, पेट्याच कमी पडल्या ग्रेट...' असे म्हणत आधी धनंजय मुंडे यांचा सत्कार केलं. महायुतीच्या बीड जिल्ह्यातील परळीसह महाविजयाबद्दल अभिनंदन केले व पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते.