Advertisement

पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर

प्रजापत्र | Saturday, 23/11/2024
बातमी शेअर करा

बारामती -राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. हायव्होल्टेज लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान मोजणी करण्यात येत असून बारामतीतशरद पवार गटाचे युगेंद्र पवार आघाडीवर असल्याचे समजते आहे. 

 

 

पोस्टल मतदानात महायुती ३८, मविआ २५, इतर ५ अशा जागांवर आघाडीवर आहेत. युगेंद्र पवारांसोबतच कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारही आघाडीवर आहेत. तर नागपूरमधून देवेंद्र फडणवीस देखील आघाडीवर आहेत. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला शनिवारी होणार असून, महायुतीचीच सत्ता पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्तेत येणार, याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. या निमित्ताने राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांपैकी ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क २० नोव्हेंबरला बजावला होता. मतदानाची टक्केवारी ६६.०५ इतकी होती. १५८ लहान-मोठे पक्ष आणि अपक्ष असे मिळून ४ हजार १३६ उमदेवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. 

 

 

२,०८७ अपक्ष उमेदवारांनीही मतदारांचा कौल मागितला. २३६ विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात आहेत. एकमेकांचे जवळचे नातेवाईक एकमेकांविरुद्ध वा वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये लढत असल्याचे यावेळचे चित्र आधी कधीही बघायला मिळाले नव्हते. निकालाच्या निमित्ताने घराणेशाहीचे राजकारण मतदारांनी स्वीकारले की नाकारले, हेही स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही राज्यातील सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे, तर ही सत्ता आपल्याकडे खेचून घेण्याचे तेवढेच मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. 

Advertisement

Advertisement