धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) -
केवळ आमदार म्हणून निवडून येणे एवढा एकमेव उद्देश घेवून आमदार राणाजगजितसिंह पाटील काम करीत नाहीत. या भागाचा व्यापक आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते सातत्याने कार्यरत आहेत. प्रसंगी राजकीय वर्चस्व पणाला लावून आपण जे महत्वपूर्ण प्रकल्प मंजूर करवून घेतले. ते सर्व आता राणाजगजितसिंह पाटील यांनी आता निर्णायक टप्प्यात आणले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केले.
मागील 40 वर्षांपासून धाराशिव जिल्ह्याची मोठ्या इमाने इतबारे आपण सेवा केली आहे आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी मागील 35 ते 40 वर्षे आपल्यावर जीवापाड प्रेम केले आहे. अगदी आपल्याप्रमाणेच आपण राणाजगजितसिंह पाटील यांना देखील मोठ्या विश्वासाने आणि आपुलकीने साथ देत आहात. मागील निवडणुकीत आपण सर्वांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने राणाजगजितसिंह पाटील यांना मतदारसंघ आणि जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली. पुन्हा यावेळी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर राणाजगजितसिंह पाटील निवडणूक लढवत आहेत. यावेळीही आपण सर्वजण मागील वेळीप्रमाणेच मोठ्या संख्येने त्यांना आशीर्वाद द्यावे, अशी विनंतीही डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केली. 2001 साली आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राजकीय वर्चस्व पणाला लावून आपण राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून घेतली. हे काम आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून आता एका निर्णायक टप्प्यापर्यंत आणले आहे. जिल्ह्यातील सिंचनाचा कायापालट करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा प्रकल्प आता लवकरच पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यातील 2.24 टीएमसी पाणी पुढील दोन महिन्यांत तुळजापूर तालुक्यातील रामदरा तलावात दाखल होईल. आपण मोठ्या परिश्रमाने मंजूर करवून घेतलेल्या बाबी आता प्रत्यक्षात साकारल्या जात असताना समाधान वाटते.
मागील वेळी आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांना दिलेल्या आशीर्वादामुळे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आपण दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुतांश योजना आणि प्रकल्पांना आता अंतिम आकार येताना दिसत आहे. अनेक योजना यशस्वीरित्या त्यांनी मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणून येथील विकासाला मोठी चालना दिली आहे. मला आपल्या सर्वांना विनंती करावयाची आहे की, राणाजगजितसिंह पाटील यांना केवळ आमदार म्हणून निवडून जायचे, एवढेच नाही, तर निवडून आल्यानंतर आपल्या भागाच्या विकासाला आणखी गती द्यायची आहे आणि आपल्या या मतदारसंघाचा, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करावयाचा आहे, या उद्देशापोटी ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्याच्या आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आपण सर्वांनी मागील वेळीप्रमाणे यंदाही बहुमताने विजयी करून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केले आहे.