Advertisement

लाडकी बहीण योजना राबवतायेत, पण महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही

प्रजापत्र | Friday, 15/11/2024
बातमी शेअर करा

पुणे: राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण सध्याच्या राज्यकर्त्यांना महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही.

देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे पण आजचे राज्यकर्ते त्याबाबत काहीच करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते .  

 

 

नेमक काय म्हणाले,'शरद पवार'

लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला ४०० खासदार निवडून द्या असे सांगत होते. कारण त्यांना  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्य घटना बदलायची होती. देशातील आमच्या सवे घटक पक्षांनी एकत्रित लोकसभा निवडणूक लढविली. महाराष्ट्र ४८ खासदारापैकी ३oखासदार महाविकास आघाडीचे आले. त्यामुळे भाजप घटक पक्ष ४००चा आकडा गाठू शकले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेला धन्यवाद दिले पाहिजे.

 

 

दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार

राज्यात महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली. त्याला हरकत नाही . महिलांच्या सन्मानाचा आनंदच आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पण राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत.याचाच अर्थ दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर मध्ये 13 हजार महिला गायब आहेत. असेही शरद पवार यांनी सांगितले

Advertisement

Advertisement