मराठा, दलित अन् मुस्लिम यांचे समीकरण जुळले आहे. आता सत्ता परिवर्तन होणार, अशी घोषणा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीनंतर केली. बैठकीस मुस्लिम, दलित समाजातील धर्मगुरू आणि नेत्यांची उपस्थिती होती. जरांगे यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजरकरणाला कलाटणी मिळणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
जरांगे पुढे म्हणाले, मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता ३ तारखेला कोणत्या जागी कोणता उमेदवार हे ठरले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे असा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला. मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाज देखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
बातमी शेअर करा