Advertisement

अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक

प्रजापत्र | Thursday, 31/10/2024
बातमी शेअर करा

  जालना- 'मराठा, मुस्लिम, दलितांच समीकरण जुळवण्यासाठी आजची बैठक आहे. आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचं असून या बैठकीत समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसतील', असा आशावाद मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. आज अंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम निर्णय काय असावा यासाठी बैठक आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सकाळी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

 

 

'उद्या दिवाळी आहे, आनंदाचा दिवस आहे. राज्यातल्या आणि देशातल्या रयतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो', असे म्हणत जरांगे यांनी आजच्या बैठकीवर भाष्य केले. 'मी फडणवीस साहेबांना सांगितलं होत, गोरगरिबांना हलक्यात घेऊ नका', या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत जरांगे यांनी मला यांच्या दहशतीतून मराठा समाज आझाद करायचा आहे. माझी मान जरी कापली तरी मी लढणार असे सांगितले. 

'आम्ही एकमताने एकत्र आलो आहेत, आमच्या सर्वांचे मत एक आहेत. कोणाच्या दबावाला, दादागिरीला भिऊ नका मताच्या बाजूने सगळ्यांनी एकत्र रहा', असे आवाहन जरांगे यांनी यावेळी केले. तसेच एक दिवसाचा आनंद उभ्या आयुष्याला कधीच पुरत नाही, आयुष्यच द्यायचं शिका. आरक्षण द्यायचं की नाही त्यांच्या हातात आहे, मात्र मत द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे, अशी स्पष्ट भूमिका जरांगे यांनी मांडली.

 

 

 

बैठकीसाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरु दाखल
अंतरवाली सराटीत बैठकीसाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरु दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात होणार आहे. वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी अंतरवाली सराटीत दाखल झालेत. मनोज जरांगे यांनी सज्जाद नोमानी यांचं अंतरवाली सराटी गावात स्वागत केल. तसेच राजरत्न आंबेडकर सुद्धा अंतरवाली सराटीत बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

Advertisement

Advertisement