Advertisement

 विखेंना भाजपचा धक्का, संगमनेरची जागा शिंदेंना

प्रजापत्र | Tuesday, 29/10/2024
बातमी शेअर करा

 अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेले माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना विधानसभेला मोठा झटका मिळाला आहे. संगमनेरची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेल्यामुळे तेथून विधानसभा निवडणूक लढवण्याचे सुजय विखे यांचे स्वप्न भंगले. गेल्या काही काळापासून त्यांनी संगमनेरमध्ये आक्रमकपणे तयारी केली. मात्र पक्षाने ही जागा शिंदे गटाला सोडली.

 

 

संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लढण्यास सुजय विखे उत्सुक होते. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्यात सुरु असलेल्या सुंदोपसुंदीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखेंना मोठा धक्का बसला आहे. विखेंच्या सभेतील वक्तव्याने हीन पातळीवर केलेल्या टीकेनंतर भाजपने सावध पवित्रा घेतल्याची चर्चा आहे.

Advertisement

Advertisement