यावर्षी मान्सून समाधानकारक बरसल्याने खरीप पिके जोमाने आली आहेत. सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांना पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता. मात्र, परतीचा पाऊस वेळेत परतेल, अशी शक्यता असताना त्यात अवकाळी पावसाची भर पडल्याने हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली. संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ऐन सणासुदीला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले आहे. पण सरकारकडून कोणतीही मदत जाहीर झाली नाही. या महत्त्वाच्या विषयांत लक्ष घालून कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
बातमी शेअर करा