बीड दि.२३ (प्रतिनिधी)-पिंपळनेर पोलीस ठाण्यातील रामप्रसाद शिवनाथ कडूळे (वय- ३६,पोलीस अंमलदार) व ईश्वर बाबासाहेब जामकर (वय-४४ होमगार्ड) या दोघांवर वाळूचा टॅक्टर चालू देण्यासाठी व बीड नगरपालिकेतील तक्रारदार यांचे वडील व त्यांचे शेजारी यांचे बांधकाम परवाना काढण्यासाठी ९ लाखांच्या लाच प्रकरणात कनिष्ठ अभियंता व खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकाच दिवशी बीड व जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्यातील रामप्रसाद शिवनाथ कडूळे (अंमलदार) व होमगार्ड ईश्वर बाबासाहेब जामकर या दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाळूचा टॅक्टर चालू देण्यासाठी ५ हजारांच्या लाच प्रकरणात हे गुन्हे दाखल करण्यात आले.होमगार्डला ताब्यात घेण्यात आले असून रामप्रसाद कडूळे फरार आहे.जालन्याच्या पथकाने बीडमध्ये येऊन ही कारवाई केली.तर दुसरीकडे बीडच्या नगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता फारुकी अखिल आहेमद वकील आहेमद याने बांधकाम परवान्यासाठी बारा लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९ लाख तक्रारदार यांना खाजगी इसम किशोर खुरमुरे यांचेकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले.म्हणून दोन्ही आरोपींना एसीबीने ताब्यात घेतले आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून लाचलुचपत विभागाच्या करवाईमुळं चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.एकाच दिवशी पोलीस आणि नगरपालिकेतील लाचखोरांवर कारवाई झाल्यामुळे बीडमध्ये मात्र अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
बातमी शेअर करा