ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक मोठा निर्णय घेत आपल्याच पक्षातील आमदार सतीश चव्हाण यांना निलंबित केलं आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याचे सांगत अजित पवार गटाने चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माहिती दिली आहे.
त्यांचं निलंबन करताना पक्षाच्या वतीने सांगितलं आलं आहे की, "१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे. असे असताना आमदार सतीश चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.