Advertisement

संभाजीनगरच्या पाच मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले

प्रजापत्र | Friday, 18/10/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील  ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरल्याची माहिती मिळत आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर मधून ठाकरे गटाचे पाच उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे पक्षांकडून आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. या उमेदवारांना लवकरच एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

 

 

कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार?

 छत्रपती संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी

 छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे

वैजापूर मतदारसंघ  - दिनेश परदेशी

 कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत

 सिल्लोड  मतदारसंघ - सुरेश बनकर

 

 

उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाजीनगर मधील पाच नेत्यांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाले आहेत. तयारीला लागण्याचा दिल्या सूचना देखील दिल्या आहेत. पुढच्या दोन दिवसात एबी फॉर्म मिळतील. अर्ज दाखल करण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वैजापूरमधून दिनेश परदेशी यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून केलं स्वागत करण्यात आले आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, कन्नड, सिल्लोड आणि पैठणच्या उमेदवाराला निवडणूक लढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

 

 

 

Advertisement

Advertisement