Advertisement

वडील आजारी, लेकाने सूत्र हातात घेतली

प्रजापत्र | Friday, 18/10/2024
बातमी शेअर करा

  मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान आमदारांची मुंबईत आज मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते (Aditya Thackeray)आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यामान आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी विद्यामान आमदारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

 

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. काही दिवसांआधीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी आज ठाकरे गटाच्या विद्यामान आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यामान आमदारांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द देखील देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये लवकरच विद्यामान आमदारांना एबी फॉर्म दिले जाणार आहे. 

Advertisement

Advertisement