मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. तीच परंपरा आता उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आज स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित केला होता. महत्त्वाचे म्हणजे यंदाचा दसरा मेळावा विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागलं होतं.काही लोक आपल्यावर चालून येत आहे. त्यांचा राजकीय शिरच्छेद केलाच पाहिले. आज दसरा रामाने रावणाचा वध केला म्हणून साजरा करतो. प्रभू रामांबरोबर वानरसेना होती. ते आमचे देव आहेत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजही आमचे देव आहेत. ते मत मिळवण्याची मशिन नाही. भाजपा मतांसाठी महाराजांचा पुतळा उभारला.त्यातही त्यांनी पैसे खालले, आम्ही प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रजापत्र | Saturday, 12/10/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा