दसऱ्याला जे शुभेच्छा संदेश दिले जातात. त्यातून सकारात्मकता, सत्य, आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणे अपेक्षित आहे. ते आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह भरतात, तसेच एकमेकांना आनंद आणि विजयाची भावना देतात. या सणाच्या निमित्ताने जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे, ज्यामुळे सण अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी बनतो. वाईट विचार आणि तशा स्वभावांचे नाश करणे हाच दसऱ्याचा खरा अर्थ. सत्याची साथ आणि कर्माचे बल अपेक्षित आहे. या दसऱ्याला नव्या सुरुवातीसाठी वाईट विचारांचे दहन करू. आशेचा दीप प्रज्वलित करूया. आपल्यातील अज्ञान, आळशीपणा आणि अहंकाराचा अंत करू.
आज विजयादशमी म्हणजेच दसरा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतिक मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा होतो. एखाद्या नवीन कार्याची सुरुवात आज करतात. भारतातील विविध ठिकाणी हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो.
प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.
दशहरा म्हणजे वाईट विचारांचा नाश आणि चांगुलपणाचा जयघोष! प्रत्येक अडथळा पार करून विजयाची दिशा गाठणे. सत्याचा मार्ग अनुसरणे, त्यात विजय तुमचाच आहे. याद्वारे लोकांना सत्य, धर्म आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते. या भूमिकेचा वापर केल्याने आपल्या प्रियजनांमध्ये सकारात्मकता आणि एकतेची भावना वाढते. नकारात्मकतेचा नाश होतो आणि चांगुलपणाचा प्रचार होतो. यातून जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते, आपल्या जवळच्यांना आनंद, शांती आणि यशाची शुभेच्छा देण्याचा एक सुंदर मार्ग आहे.
दसऱ्याला जे शुभेच्छा संदेश दिले जातात.त्यातून सकारात्मकता, सत्य, आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणे अपेक्षित आहेत. ते आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह भरतात, तसेच एकमेकांना आनंद आणि विजयाची भावना देतात. या सणाच्या निमित्ताने जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे, ज्यामुळे सण अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी बनतो. वाईट विचार आणि तशा स्वभावांचे नाश करणे हाच दसऱ्याचा खरा अर्थ. सत्याची साथ आणि कर्माचे बल अपेक्षित आहे. या दसऱ्याला नव्या सुरुवातीसाठी वाईट विचारांचे दहन करू. आशेचा दीप प्रज्वलित करूया. आपल्यातील अज्ञान, आळशीपणा आणि अहंकाराचा अंत करू.
थोडक्यात आपण वास्तव समजून उमजून वागले पाहिजे. रावणाची प्रतिमा जाळणे सोपं आहे. पण स्वतःमध्ये आवश्यक बदल करणं सोपं नसतं त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. समाजात जाती धर्माच्या नावाखाली जो द्वेष निर्माण केला जातो आहे त्याला आपण थांबविण्यासाठी सतर्क होण्याची गरज आहे. अन्याय, अत्याचार, लूट, फसवणूक याविरोधात ठाम भूमिका घेवून त्यांच्या सामोरे गेले पाहिजे. विरोधी भूमिका घेताना प्रेम संपायला नको. राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. कोणाच्याही कसल्याही आमिषाला बळी न पडता त्यात सुधारणा होण्यासाठी आपली जवाबदारी ओळखून ठामपणे भूमिका घेणं आवश्यक आहे. आपणास चांगला समाज, आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करुन कार्याची सुरुवात करुयात.
सर्वांना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा!