Advertisement

संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या 

प्रजापत्र | Saturday, 23/08/2025
बातमी शेअर करा

 परळी दि.२३ (प्रतिनिधी): तालुक्यातील (Parli) नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. केज येथील एका शैक्षणिक संस्थेत अनुकंप तत्त्वावर हा तरुण पूर्वी कार्यरत होता. याच संस्थेतील संस्थाचालकांनी त्रास दिल्याच्या कारणावरून संबंधित तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.

            मिळालेल्या माहितीनुसार, परळी(Parli) तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी श्रीनाथ गोविंद कराड (वय २५) याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो परळी तालुक्यातील वसंत नगर येथील प्राथमिक आश्रमशाळेत अनुकंपा तत्त्वावर कामाठी (सेवक) म्हणून एक महिन्यापूर्वीच सेवेत रुजू झाला होता. यापूर्वी तो केज येथील एका निवासी शाळेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी १२ वर्ष झाले (Crime)तरी त्याला संस्थाचालकांनी कायमस्वरूपी करून घेतलं नव्हतं. यामुळे तो आर्थिक आणि मानसिक संकटात असल्याचं देखील बोललं जात आहे.केज येथील याच संस्थेत त्याच्या वडिलांनीही शिक्षक म्हणून अनेक वर्ष सेवा दिल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एक महिन्यापूर्वी तो परळी तालुक्यातील वसंत नगर येथील प्राथमिक आश्रम शाळेत सेवक म्हणून लागला होता. दरम्यान, श्रीनाथ याने (School)नंदागौळ येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करीत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 

Advertisement

Advertisement