बीड दि.२२ (प्रतिनिधी): दुचाकीवरून (Accident) जात असतांना स्पीड ब्रेकरवरून गाडी जोरात आदळल्याने पाठीमागे बसलेल्या ३२ वर्षीय महिला खाली पडल्याने यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यु झाला. ही घटना गुंदावडगाव शिवारामध्ये घडली आहे.
कैलास गंपू चव्हाण रा.अंबूनाईक तांडा, खांडवी ता.गेवराई हे मोटार सायकलवरून जात असतांना त्यांच्या पाठी मागे बसलेली महिला वंदना शिवाजी राठोड (वय ३२) ह्या गाडीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असता . त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान या महिलेचामृत्यु झाला आहे.
बातमी शेअर करा