परळी-तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. तालुक्यातील सात ग्रामपंचायती पैक्की २ ग्रामपंचायत बिनविरोध आली होती. तर आज निकाल लागल्यानंतर इतर ५ ग्रामपंचायतमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. यामुळे निवडणूक काळात धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाचा राष्ट्रवादीच्या मतांवर परिणाम न झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी तालुक्यात रेवली, वंजारवाडी, लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर, भोपळा अशा ७ ग्रामपंचायत आहेत. यातील रेवली आणि वंजारवाडी या दोन ग्रामपंचायत सुरुतीलाच बिनविरोध राखण्यात यश आले. यानंतर इतर ५ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर या कालावधीतच अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांना घेरण्याचा पर्यंत केला. मात्र, मतदानावर याचा परिणाम झाला नसल्याचे आज आलेल्या निकालावरून दिसून आले आहे. मतदान झालेल्या लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर, भोपळा या पाच ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी समर्थकांची सत्ता आली आहे. निकालानंतर जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू आहे.
बातमी शेअर करा