Advertisement

चारचाकी दुचाकीच्या अपघातात एक जण ठार

प्रजापत्र | Friday, 30/08/2024
बातमी शेअर करा

 परळी वैजनाथ दि.३० (प्रतीनिधी)-तालुक्यातील इंजेगाव येथे कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. परळी- सोनपेठ मार्गावर  चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये इंजेगाव येथील एकजण ठार झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३०) रात्री आठ वाजता घडली. ज्ञानोबा पंडित कराड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कराड हे शेतातील काम करुन दुचाकीवरुन घरी येत होते. यावेळी समोरुन येणाऱ्या चारचाकीने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. यानंतर गावकर्‍यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Advertisement

Advertisement