आष्टी दि. ३० (प्रतिनिधी) प्रविण पोकळे - तालुक्यातील केरुळ येथील टेंभीच्या माळाजवळील भागवत वस्तीवर दरोडेखोरांनी दशहत माजवत सशस्त्र दरोडा टाकला.मारहाण करत दरोडेखोरांनी लाखों रुपायांच्या रोख रकमेसह मुद्देमाल लूटला.या हल्ल्यात राजू महादेव भागवत (वय ३०) यांच्यावर सुमारे नऊ चाकुचे वार झाल्याने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सोमवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला.
अधिक माहिती अशीकि ,केरुळ येथील राजू महादेव भागवत यांच्या घरामध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात ७ ते ८ दरोडेखोर काठी, कुऱ्हाड,चाकू अशी हत्यारे घेऊन घरात घुसले. कुटुंबातील मुलासह सर्वांना काठीने मारहाण करत चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली.दरोडेखोरांनी भागवत यांच्या घरातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लूटले.भागवत यांच्या घरात दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या राजू महादेव भागवत यांना मारहाण करत त्यांच्यावर जवळपास चाकूने नऊ वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर पसार झाले.गावात दरोडा पडल्याचे समजताच अनेकजण जमले.नागरिकांनी डायल ११२ वर माहिती दिली.त्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते .दरोडेखोरांना पकडण्यासाठी पहाटेपासून पोलिसांचा फौजफाटा सर्वत्र फिरत आहे. स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस शोध घेत आहेत .
आठ दिवसातच दुसरा दरोडा
गेल्या आठ दिवसापूर्वीच केरुळ पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्ही येथील केरुळ रोडवरील काकडे वस्तीवर दरोडा पडला होता.यामध्ये जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरत येथील कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली होती.असून या घटनेचा तपास लागला नसतानाच किन्ही पासून पाच किलोमीटरवर अंतरावर असलेल्या केरुळ येथे हा दुसरा दरोडा पडला आहे.याबाबत आष्टी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तालुका दर्जाचे पोलीस ठाणे प्रभारीच्या जबाबदारीवर
आष्टी शहरासह पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होत असून,पोलीस याकडे जाणून-बूजून डोळेझाक करत आहे.पोलिसांना एखाद्या घटनेचा तपास लावण्याऐवजी अवैध धंदेवाल्याकडून हप्ते वसुली करण्यात दंग असल्याचे दिसत येत असून आष्टी तालुक्या सारखे पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दर्जाचे ठाणे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या प्रभारीच्या जबाबदारीवर चालत असल्याने तालुक्यात वारंवार असे प्रकार घडत असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.