Advertisement

अखेर पप्पू शिंदेंची हर्सूल कारागृहात रवानगी

प्रजापत्र | Wednesday, 24/04/2024
बातमी शेअर करा

बीड-शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा मेहुणा असलेल्या पप्पू शिंदेवर अखेर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पहाटेच्या सुमारास पप्पूची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.पप्पू शिंदेंवर बीडमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा मेहुणा असल्याने त्याला पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप करण्यात येत होता. 
         

 

   बीड शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात ३०७ कलमाखाली पप्पू शिंदेंवर यापूर्वी दोन ते तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.बीडच्या जाळपोळ प्रकरणात ही मुख्य आरोपी म्हणून पप्पूचा समावेश होता.काही दिवसापूर्वी कुंडलिक खांडेचे राजकीय विरोधक असलेल्या उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडेवर जीवघेणा हल्ला ही पप्पूने केला होता.याप्रकरणात त्याच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अखेर काल रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास स्वामी समर्थ मंदिराशेजारी बीड शहर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.त्याच्यावर एमपीडीअंतर्गत कारवाई करण्यात आली असून पहाटे त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,मनोज परजने,अशपाक सय्यद,श्री.सिरसाट,सुशांत पवार,श्री.राठोड  यांच्या वतीने करण्यात आली. 

Advertisement

Advertisement