Advertisement

चोरट्यांनी पोलिसांची फोर व्हिलर चोरली

प्रजापत्र | Friday, 26/07/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२६ (प्रतिनिधी)- शहरातील राजू नगर भागातून दोन चोरट्यांनी मोटारसायकल चोरली त्याच मोटारसायकलवर बसून चोरटे अंकुशनगर भागात गेले. चोरलेली मोटारसायकल तिथेच सोडून तेथून एका पोलिस कर्मचाऱ्याची फोर व्हिलर चोरून नेल्याची घटना आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सदरील घटनेचे सिसिटिव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये गाडी घेवून जातांना दोघेजण दिसत आहेत.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नव्हता.

Advertisement

Advertisement