बीड-जिल्ह्यातील ९ पोलीस अधिकार्यांना नवीन ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या असून सहा जणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेतला आहे. शुक्रवारी सायंकाळी याबाबत एसपींनी आदेश काढले.
बीड जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तर बारा पोलीस उपनिरीक्षकांचा यात समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये विजयसिंग शिवलाल जोनवाल माजलगाव ग्रामीणवरून माजलगाव शहरला, अब्दूल मजीद उस्मान शेख अर्ज चौकशी शाखामधून डायल ११२ ला तर संतोष तेजराव जंजाळ गेवराईत (१ वर्ष मुदतवाढ) मिळाली आहे.पोलीस उपनिरीक्षकांमध्ये सय्यद शफीक सय्यद गफार (वाचक शाखा), बाबासाहेब भगवान जायभाये (दोष सिद्धी कक्ष), भारत पांडूरंग बर्डे (आर्थिक गुन्हे शाखा), शिवाजी एकनाथ भुतेकर (गेवराई), राजेश उदयसिंग पाटील (केज) यांना मुदतवाढ मिळाली आहे. तर इतर पोलीस उपनिरीक्षकांमध्ये वैभव सारंग यांना केज वरून माजलगाव ग्रामीण, गणेश झांबरेंना परळी ग्रामीणमधून अंबाजोगाईची वाचक शाखा, सुनील बोडखेंना माजलगाव ग्रामीणमधून तलवाडा, आदिनाथ बोडखेंना अंभोर्यातून पाटोदा तर बाबासाहेब भवर तलवाडावरून धारूर आणि अजय पानपाटील नेकनूरवरून चकलांबा पोलीस ठाण्यात गेले आहेत. नंदकुमार ठाकूर यांनी या अधिकार्यांचे आदेश जारी केले.

प्रजापत्र | Friday, 26/07/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा