नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. स्वतः त्यांनीच पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मी नाशिकमधून लढावं, असं मोदी-शाहांनी सुचवलं होतं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र मी नाशिकमधून लढणार नाही, मी माघार घेतली आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाचे लोक माझ्यासोबत होते . पाच वर्षांमध्ये जी कामं झाली आहेत त्यामुळे त्यांनी मला समर्थन दिलं होतं. परंतु मी माघार घेत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
बातमी शेअर करा