Advertisement

 अत्याचार प्रकरणातील पीडितेची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 12/04/2024
बातमी शेअर करा

आष्टी दि.१२ (प्रतिनिधी)- अत्याचार प्रकरणातील एका अल्पवयीन पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री आष्टी तालुक्यात घडली आहे.बदनामी झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

आष्टी तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात सुरुवातीला अपहरणाची तक्रार दाखल होती. मात्र नंतर पीडितेने स्वतः जवाब दिल्याने यामध्ये पास्कोसह इतर कलमानुसार आष्टी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नसून पोलीस तपास सुरू असतांनाच पीडित मुलीने काल रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबतची माहिती आष्टी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची नोंद घेतली. पोलीस पुढील तपास करत असून पीडितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसले तरी बदनामी झाल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Advertisement