Advertisement

तोडकर योगीराज यांचे निधन

प्रजापत्र | Thursday, 07/01/2021
बातमी शेअर करा

बीड -शहरातील प्रसिद्ध मेडिकल व्यावसायिक तसेच आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद मध्ये सक्रिय सहभाग असलेले योगीराज तोडकर यांचे औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना निधन झाले .

मागील वीस बावीस दिवसापासून तोडकर यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते,मध्यंतरी त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा झाली होती,पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात येणार होते,त्या दरम्यान त्यांना हृदयविकार चा झटका आल्याने त्यात तोडकर यांची प्राणज्योत मालवली .

मडिकल एजन्सीच्या व्यवसायात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासोबतच सामाजिक उपक्रमात देखील ते नेहमी अग्रेसर असायचे .संघाच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा .त्यांच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे .

Advertisement

Advertisement