Advertisement

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर

प्रजापत्र | Wednesday, 03/04/2024
बातमी शेअर करा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा  मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  याआधी ठाकरे गटाने १७ जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती.   

उत्तर मुंबई आम्ही मित्र पक्षाला विचारतोय आमच्याकडे उमेदवार आहेत पण मित्र पक्षाला विचारतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. 

 

 

ठाकरेंची दुसरी उमेदवार यादी,कल्याण लोकसभा - वैशाली दरेकर ,हातकणंगले - सत्यजीत पाटील,पालघर - भारती कामडी,जळगाव - करण पवार 

 

 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणी फिसकटली नाही. हातकणंगले आणि सांगली आम्ही लढत आहोत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिकडचे राजकीय गणित पाहता आम्हाला कार्याकर्त्यांनी विनंती केली की आमचा उमेदवार द्यावा.  राजू शेट्टी यांना म्हटलं आम्ही पाठिंबा देऊ तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवा, त्यांनी नकार दिला, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

 

Advertisement

Advertisement