Advertisement

दिलीप वळसे पाटील पाय घसरून पडले

प्रजापत्र | Thursday, 28/03/2024
बातमी शेअर करा

पुणे- राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या खुब्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.औध येथील खासगी रुग्णालयात वळसे-पाटील यांना दाखल करण्यात आले आहे. वळसे पाटील यांच्या हातावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रात्री अंधारात लाईट सुरू करायला जाताना ते पाय घसरुन पडले. यामुळे त्यांच्या खुब्याला आणि हाताला गंभीर मार लागलाय.

 

 

पाटील यांच्या हातावर शस्रत्रक्रिया केली जाणार आहे. प्रकृती स्थिर मात्र १२ ते १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहतील असा अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे-पाटलांवर निवडणूकीची मोठी जबाबदारी असताना दुखापत झाली.आढळराव पाटीलांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे-पाटलांवर आहे. त्यात त्यांचा अपघात झाल्याने प्रचार सत्र उशिराने सुरू होईल अशी शक्यता आहे.
 

Advertisement

Advertisement