Advertisement

बीड-नगर राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघे जागीच ठार

प्रजापत्र | Sunday, 24/03/2024
बातमी शेअर करा

कडा- कडा येथील काम आवरून संकुडवाडी कडे निघालेल्या दुचाकीचालकाला एकाने लिफ्ट मागितली. मात्र काही अंतरावर जाताच बीड-नगर राज्य महामार्गावरील डोईठाण येथील शिवनेरी चौकात टँकरच्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात दुपारी चार वाजता झाला असून मृत दोघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

 

 

पाटोदा तालुक्यातील संकुडवाडी येथील दुचाकी चालक रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून धामणगांव मार्ग गावाकडे जात होता. धामणगाव येथे रोडवर उभा असलेल्या एकाने लिप्ट मागितल्याने त्याला घेऊन तो पुढे निघाला. मात्र काही अंतरावर जाताच बीड नगर राज्य महामार्गावरील डोईठाण परिसरातील शिवनेरी चौकात बीडहून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या टँकरसोबत ( क्रमांक एम.एच १६, सी.सी.७६३१) दुचाकीची जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच टँकर चालक पसार झाला होता. कडा पोलिसांनी पाठलाग करत चालकाला टँकरसह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आष्टी पोलिस देखील तात्काळ दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात रवाना करून वाहतूक सुरळीत केली.

Advertisement

Advertisement