Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

प्रजापत्र | Thursday, 21/03/2024
बातमी शेअर करा

दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय. ईडीच्या टीमने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलीय. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने आधी त्याच्या घराची झडती घेतली आणि नंतर त्याची चौकशी केली, यानंतर तपास यंत्रणेने त्यांना अटक केली. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. 

दरम्यान आज ईडीचे अधिकारी शोध वॉरंट घेऊन तपास यंत्रणेचे पथक केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली पीएमएलएच्या कलम ५० अंतर्गत मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवण्यात आला त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय

Advertisement

Advertisement