"मुंबई महापालिका सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्या देशातील पालिकांपैकी एक आहे. क्वालिटी आणि कॅान्टीटीमध्ये काहीच तडजोड नाही. मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे.त्यामुळे सफाई कर्मचा-यांच्या मुलांच्या परदेश शिक्षणाचा खर्च पालिका करणार आहे", अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते मुंबईत बोलत होते.
१० हजार कोटी पेक्षा जास्तीचे प्रकल्प कधीच झाले नव्हते. राज्यात आता २ लाख कोटींचे प्रकल्प मुंबई मनपात सुरु आहेत. मनपाच्या जीवावर इतर लोकांनी खर्च केला. आंचारसंहिता कघीही लागेल म्हणुन कार्यक्रम लवकरात लवकरात करतोय. मी कॅालेज मधील सर्व ठिकाणी फिरलोय. नायर हॅास्पिटलचे हे कॅालेज ५ star हॅाटेल पेक्षा कमी नाहीये. ॲापरेशन कसे करतात हे देखील मी आता बघितले. मी पण ॲापरेशन केलेत. डॅाक्टरेट मला मिळण्याआधीच मी ॲाप्रेशन केलेत, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना नमूदं केले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांना आता मुंबईत खड्डे बघायला मिळणार नाहीत. आम्ही प्रदुषण मुक्त मुंबई करणार आहोत. ग्रीन कव्हर तयार करणार आहोत. शिवाय मॅन मेड फॅारेस्ट तयार करण्याची तयारी सुरु आहे. २०० एकरमध्ये जागतीक दर्जाचे उद्यान बनवतोय. रेस कोर्समध्ये घोडे पळायचे आता मुलं पळतील. गार्डन शहरांची फुप्फुस आहेत. एक मोठे सेंट्रल पार्क होईल.