अविनाश इंगावले
गेवराई दि : सकाळी साडे सहा वाजण्याच्या दरम्यान एका शेतकरी याला वाळूच्या टिप्परने चिरडले असल्याची घटना तालुक्यातील राक्षसभूवन जवळ घडली हा अपघात ऐवढा भीषन होता यात मयतांचे तूकडे झाले आहेत एका पाठोपाठ तिन ते चार हायवा चिरडून गेल्यानं हि परिस्थीती झाली गंगावाडी येथील संतप्त ग्रामस्थ यांनी प्रशासना विरोधात रस्त्यावर ठिय्या मांडून अंदोलन सुरू केले
या बाबद अधीक माहिती अशी कि , तालुक्यातील सावळेश्वर , राक्षसभूवन , गंगावाडी , या ठिकाणावरून अनाधिकृत वाळू उपसा करूण हायवा जातात तसेच ( दि ४ जानेवारी ) रोजी रूस्तूम बाळाजी मते वय ५५ वर्ष राहनार गंगावाडी हे आपल्या शेतात जात असतांना राक्षसभूवन कमानी जवळ त्यांचा अंगावर वाळूचा हायवा गेल्यानं दूर्दैवी मृत्यू झाला एका पाठोपाठ तिन हायवा गाड्या मृताच्या अंगावरून गेल्यानं संतप्त ग्रामस्त यांनी ठिय्या अंदोलनाला सुरूवात केली जोपर्यंत जिल्हाधीकारी येत नाहीत तो पर्यंत शव उचलू देनार नाहीत तसेच दोषी तलाठी व पोलीस कर्मचारी यांच तात्काळ निलंबन करावे तसेच आरोपी तात्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी धरून लावली होती . तसेच हप्तेखोरी मुळे असे प्रकार वारवांर घडत आहेत स्थानिक प्रशासनातल्या मंडळ अधीकारी तलाठी व पोलीस कर्मचारी यांच्याच त्या हायवा गाड्या होत्या अशी चर्चा ग्रामस्त यांच्यात होती .
घटनेचं गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय अधीकारी नामदेव टिळेकर , पोलीस उपविभागीय अधीकारी सोप्नील राठोड , अतिरित्त तहसिलदार रामदासी , पोलीस निरीक्षक पुर्षोत्तम चौभे , नायब तहसिलदार प्रशांत जाधवर , सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे , चंकलाबा पोलीस देशमुख , पोलीस उप निरीक्षक युवराज टाकसाळे , आरोग्य अधीकारी डॉ मुकेश कुचेरीया डॉ रियाज शेख यांनी घटनास्तळी तात्काळ उपस्तीथ झाले होते .
घटनेनंतर परिसराला छावनीचे स्वरूप आले होते दंगल नियत्रंन पथकांच्या एका तूकडीने देखील पाचारन केले होते स्थानिक ग्रामस्त व पोलीस व महसुल कर्मचारी यांच्यात शाब्दीक चकमक देखिल झाली होती यामुळं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्तीथी हाताच्या बाहेर जाऊ नये म्हणून उपविभागीय अधीकारी नामदेव टिळेकर यांनी जिल्हाधीकारी यांना फोनवर संपुर्ण माहीती दिली तसेच तात्काळ घटनास्तळावर निर्णय घेण्याचे आदेश दिले तसेच या संपुर्ण घटनेला जबाबदार असणारे राक्षसभूवन सज्याचे तलाठी वाकोडे तसेच बिट आमलदार क्षीरसागर यांना तात्काळ निलंबनाची शिफासर करण्यात आली आहे तसेच चोविस तासांत आरोपी केला जाईल व स्व गोपिनाथ मुंडे अपघात योजनेतून मयताच्या कुंटूबियांना मदत केली जाईल असे लेखी अश्वासन महसुलचे उपविभागीय अधीकारी नामदेव टिळेकर तसेच पोलीस उपविभागीय अधीकारी सोप्नील राठोड यांनी दिले आहे लेखी अश्वासनानंतर ग्रामस्त यांनी आपले अंदोलन मागे घेतले आहे .
जिल्हाधीकारी यांनी मनसेच्या मागणी ची दखल घेतली असती तर त्या शेतक-याचे प्राण वाचले असते
गेल्या आठवडा भरापुर्वी राक्षसभूवन , सावळेश्वर , गंगावाडी , या ठिकाणावरून अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याची तक्रार जिल्हाधीकारी यांना केली होती परंतू पोलीस , कर्मचारी , तलाठी , मंडळ अधीकारी , यांच्या मालकीच्या वाळू हायवा आहेत एका पाठोपाठ पाच हायवा या शेतकरी यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे याप्रकणी स्थानिक मंडळ अधीकारी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना तात्काळ निलंबीत करा अशी मागणी मनसेचे जिल्हाधक्ष राजेंद्र मोटे यांनी केली आहे .