राज्यात 50 % महिलांनाच दहावीनंतरच्या शिक्षणाची संधी तर बीडचा टक्का 39
बीड-सावित्रीमाई फुले यांची जयंती स्त्री होत असताना आजही राज्यात सावित्रीच्या लेकींसाठी उच्च शिक्षणाची वाट अवघडच असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. आजही राज्यातील केवळ 50 % मुली, महिलांनाच दहावीनंतरच्या शिक्षणाची संधी मिळत असल्याचे चित्र आहे, तर बीड जिल्ह्यात हा टक्का आणखीच कमी म्हणजे अवघा 38. 6 इतका आहे. ‘बेटी पढाव’ चे ढोल वाजविणे सुरु असतानाचे हे चित्र चिंताजनक आहे.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. आज आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो मात्र आजही स्त्री शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र मागेच असल्याचेचित्र आहे. राज्यातील साक्षर (किमान 9 वि उत्तीर्ण) महिलांचा टक्का 84. 6 इतका आहे, मात्र त्यातील मोठ्या प्रमाणावर मुली आणि महिलांना आपले शिक्षण दहावीतच सोडून द्यावे लागते. दहावीनंतरचे शिक्षण घेऊ शकणार्या मुलींची राज्याची टक्केवारी केवळ 50 % इतकीच आहे. तर उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची संधी मिळू शकणार्या मुलींचा टक्का आणखीच कमी आहे. देशपातळीवरील कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे 5 वर्षांपूर्वी दहावीपेक्षा अधिक शिक्षणाची संधी मिळालेल्या मुलींची टक्केवारी 42 इतकी होती , त्यात 5 वर्षात केवळ 8 % ची भर घालता आली आहे.
बीड जिल्ह्यातील चित्र तर यापेक्षा अधिक भीषण आहे. या जिल्ह्यातील साक्षर महिलांचे प्रमाण 76 % इतके आहे, तर दहावीपेक्षा अधिक शिक्षण घेऊशकणार्या मुलींचा टक्का अवघा 39 आहे. 5 वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात हा टक्का 31 इतका होता . बीड जिल्ह्याच्या तुलनेत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे प्रमाण प्रत्येकी 45 % इतके आहे. बेटी पढाव सारख्या योजना असल्या तरी गावपातळीवर महाविद्यालयीन शिक्षणाच्या सोयी नसणे , शहरी भागातील असुरक्षितता , महागडे होत चाललेले शिक्षण अशा अनेक बाबींमुळे सावित्रीच्या लेकिन ना दहावीनंतरचे शिक्षण अवघड वाट ठरत आहे.
घटक | राज्य |
बीड |
लातूर |
उस्मानाबाद |
महिला साक्षरता |
84.6 | 76.3 | 83.3 | 83.7 |
शाळेत गेलेल्या महिला |
79.6 | 64.6 |
70.6 | 71.3 |
दहावीनंतरचे शिक्षण घेतलेल्या |
50.4 |
38.6 |
40.7 |
41.5 |