बीड-शहरातील विविध हॉटेलच्या लॉजिंगमध्ये काही गैरप्रकार सुरु आहेत का याची झाडाझाडती घेण्याचे काम पोलिसांच्या वतीने आज सकाळपासून सुरु असल्याचे चित्र बीडमध्ये आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने ही तपासणी मोहीम राबविण्यात येतं असल्याची माहिती आहे.अल्पवयीन मुलींना लॉजिंगमध्ये रूम देण्यात येतं असेल किंवा काही गैरकृत्य सुरु असेल तर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पल्लवी जाधव यांनी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या प्रतिबंधक विभागाची जबाबदारी घेतल्यापासून अनेक चर्चेतील कारवाया केल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून त्यांनी बीड शहारातील विविध हॉटेलला भेट देत लॉजिंगची पाहणी करत काही गैरप्रकार सुरु तर नाहीत ना याची खात्री केली. अचानकपणे पोलिसांनी हॉटेलच्या तपासणीची मोहीम हाती घेतल्याने हॉटेल चालकांमध्ये धावपळ उडाली होती. बीडमध्ये कुठेही दुपारपर्यंत तरी कोणताही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे पल्लवी जाधव यांनी प्रजापत्रशी बोलताना म्हटले आहे. सध्या त्यांची मोहीम सुरुच असल्याचे कळते.

बातमी शेअर करा