Advertisement

विविध मागण्यासाठी शासकीय गोदामतील हमालांचे एक दिवासीय धरणे आंदोलन

प्रजापत्र | Monday, 04/03/2024
बातमी शेअर करा

शिरूरकासार- बीड जिल्ह्यातील शासकीय गोदामतील हमालांचे गेल्या ३७ दिवसापासून बीड येथे विविध मागण्यासाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिरूरकासार येथील तहसीलच्या प्रांगनात आज सोमवार (दि.४) सकाळी ११ वाजल्यापासून एक दिवशीय धरणे आंदोलन चालू केले आहे.

      गेल्या महिन्याभरापासून बीड येथे राज्य हमाली मापाडी धरणे आंदोलन चालू असून मागण्या मान्य होत नसल्याने ४ मार्चपासून महामंडळाचे अध्यक्ष व महामंडळाचे उपाध्यक्ष राजकुमार घायाळ हे बेमुदत उपोषणास बसले असून त्यांना पाठिंबा म्हणून शिरूरकासार तहसील येथे हमाल बांधव आज सोमवार (दि.४) सकाळी ११ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार असून आम्हाला न्याय द्यावा नसता आमच्यावर उपासमारीची वेळ येईल अश्या अश्यायचे निवेदन त्यांनी दिले आहे. 
 

Advertisement

Advertisement