जालना- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून हे कटकास्थान फडणवीसांचं आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जरांगेंच्या आरोपानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.
बातमी शेअर करा